औसा: औशाचे आ.अभिमन्यू पवार दुबईत 'नवभारत अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित
Ausa, Latur | Mar 12, 2024 कायम दुर्लक्षित राहिलेल्या शेतरस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे आस्थापूर्व विशेष लक्ष देवून 'शेत तिथे रस्ता' अभियान हाती घेत या विषयात संपूर्ण राज्यात 'औसा पॅटर्न' निर्माण केल्याच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना "नवभारत अॅचिव्हर्स अवार्ड' हा पुरस्कार दुबई येथील कार्यक्रमात दुबई राज परिवाराचे प्रमुख सन्माननीय शेख मोहम्मद यांच्या वरिष्ठ सल्लागार डॉ अर्शी आयुब यांच्या हस्ते देण्यात आला.