धर्माबाद: आष्टी ग्रामपंचायतीत सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिर संपन्न
575 views | Nanded, Maharashtra | Oct 13, 2026 धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायत आष्टी येथे उपकेंद्र मंगनाळी यांच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात माता व बालकांचे लसीकरण करण्यासोबतच ग्रामस्थांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच नागरिकांना स्वच्छता व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.