पनवेल महानगरपालिका मुख्यालयातआज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी थोर किर्तनकार, समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, पालिका सदस्य बबन मुकादम, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त रवीकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.