कळमेश्वर: 28 जुलै रोजी कळमेश्वर नगर परिषद कार्यालया धडक मोर्चा व तीव्र आंदोलन
कळमेश्वर शहरातील वाढीव घरकराच्या विरोधात मंगळवार, दि. २८ जुलै रोजी कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा व तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.शहरातील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेली घरकरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनात सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे मंगेश गमे यांच्यातर्फे करण्यात आले