नरखेड: नारसिंगी येथील प्रलंबित पांदण रस्त्याचा प्रश्न सुटला; आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केली पाहणी
नरखेड तालुक्यातील नारसिंगी येथील शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या पुढाकारामुळे अखेर मार्गी लागला आहे. आमदार ठाकूर यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पांदण रस्त्याची पाहणी केली.