शाहूवाडी: वारणा धरणातून विसर्ग वाढवण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वारणा धरण व्यवस्थापनाकडून आज रविवार दिनांक 6 जुलै सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जलाशय परिचलन योजनेनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सात जुलैला विसर्ग वाढविण्यात येणार आहे.