वर्धा: वर्ध्यात लहान आर्वी ग्रामपंचायतीत पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी
Wardha, Wardha | Sep 30, 2026 आष्टी तालुक्यातील लहान आर्वी ग्रामपंचायत कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच सुनिल साबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतीमेवर पुष्पहार अर्पण केला गेला.