आजरा: आजरा-आंबोली मार्गावर 17 वर्षीय युवकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
Ajra, Kolhapur | Nov 4, 2026 आजरा-आंबोली मार्गावर धनगरमोळा जवळील अपघातात समर्थ पांडुरंग पांगम (17) याचा जागीच मृत्यू झाला. मित्र संस्कार अमित सुतार गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. शेवटचा पेपर संपताच फिरण्यासाठी निघालेले तीन मित्र अपघाताच्या भोवऱ्यात आले.