रोहा: पाच जून ते सहा जून दरम्यान जड-अवजड वाहतुकीला बंदी
Roha, Raigad | Jun 4, 2026 श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पाच जून रोजी दुपारी चार ते सहा जून रोजी रात्री दहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये संबंधित विभागातील महामार्गांवर जड अवजड वाहतुकीस बंदीचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे.