नाशिक: इंदिरानगर भागातील पेठे रोड येथे घरफोडी करून चोरट्यांनी 2 लाख 76 हजारांचा ऐवज केला चोरी
Nashik, Nashik | Jan 10, 2026 इंदिरानगर भागातील पेठे रोड येथे घरफोडी करून चोरट्यांनी 2 लाख 76 हजारांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभांगी रामदास क्षीरसागर राहणार पेठ रोड, शांती मंगल अपार्टमेंट यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.