हवेली: चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्ही आला समोर
Haveli, Pune | Aug 2, 2025 चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना मिलिंद कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यायाम करत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते जागेवर कोसळले.त्यांना तात्काळ मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.