कळमेश्वर: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असलेल्या निमजी लॉजिस्टिक गोदामात दुर्घटना, इव्हेंट मॅनेजमेंट चे तीन कामगार भाजले
दिनांक 23.05.2026 रोजी रात्री 8.20 वाजता चे सुमारास कळमेश्वर 14 मैल रोडवरील निमजी गोदाम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतांना करंट लागून तीन कामगार जखमी झाले आहेत. आज दिनांक 24/05/26 ला 11.00 वाजता ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.त्यापूर्वी इव्हेंट मॅनेजमेंट करणारे कामगार पैकी तीन कामगारांना इलेक्ट्रिक करंट लागून जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्य