भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांचा UAE कडून सर्वोच्च सन्मान!
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून प्रतिष्ठेचा ‘ऑर्डर ऑफ झायेद II (प्रथम श्रेणी)’ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हवेत असताना संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी दाखवलेले असामान्य धैर्य, कौशल्य आणि प्रसंगावधान यांची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा गौरव वाढला असून, ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
#CaptainSmitMachchhar #UAEHonour #OrderOfZayedII #IndianAviation #ProudIndia
Pune City, Pune | Oct 28, 2026