पुण्याच्या माजी नगरसेविका हमिदा अनिस सुंडके यांचे निधन; सुंडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर
🕊️ पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून दुःखद बातमी!
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस रशीद सुंडके यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका हमिदा अनिस सुंडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या प्रभागात आणि विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर काम केले होते. त्यांच्या निधनाने सुंडके कुटुंबीयांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
🕌 नमाज-ए-जनाजा: आज रात्री १ वाजता, दिलेल्या माहितीनुसार.
🙏 टाइम्स ऑफ महाराष्ट्र परिवारातर्फे दिवंगत हमिदा सुंडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.
#HamidaSundke #PuneNews #Pune #श्रद्धांजली #पुणे HamidaAnisSundke TimesOfMaharashtra मराठीबातम्या
Pune City, Pune | Oct 28, 2026