कळमेश्वर: गोंड खैरी येथे हातभट्टी अड्डे उध्वस्त, नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत गोंडखैरी परिसरातील हातभट्टी अड्ड्यावर धडक कारवाई करत चार महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले या कारवाई देशी दारू मोहा फुलाचा चढवा आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. एकूण पाच लाख 17 हजार पाचशे रुपयाचे साहित्य जमा करण्यात आले