रामटेक: वैशाखाचे कडक ऊन्ह, अन भर उन्हात लोधा, पिंडकापार, बेलदा परिसरात पडला गारांचा पाऊस.
Ramtek, Nagpur | May 5, 2026 निसर्गाच्या अनियमिततेने एवढ्यात सर्वच आश्चर्यचकित होत आहेत. अशातच वैशाखाच्या तापमानाने अंगाची लाही लाही होत असतानाच मंगळवार दिनांक पाच मे ला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रखरखत्या उन्हात निसर्गाने अचानक कुस बदलवित रामटेक तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या लोधा, पिंडकापार, बेलदा या गाव परिसरात गारांचा पाऊस बरसला. अचानक तडतड गारा बरसु लागल्या.