पनवेल: पनवेल महापालिका हद्दीत ६४ इमारती अतिधोकादायक
Panvel, Raigad | Jul 3, 2026 पनवेल महानगरपालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने घरे रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. सन २०२६-२७ साठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका क्षेत्रातील ६४ इमारतींना 'सी-१' अर्थात अतिधोकादायक प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आहे.