नरखेड: जलालखेडा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू अड्ड्यांवर छापे, ७ आरोपींवर गुन्हे दाखल
Narkhed, Nagpur | May 30, 2026 मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा रामठी येथे ३० मे रोजी अवैध देशी, विदेशी आणि गावठी दारू तस्करांविरोधात एक विशेष मोहीम राबवण्यात आली. नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस, दंगल नियंत्रण पथक व होमगार्ड यांनी ही संयुक्त कारवाई केली