मंठा: मंठा तालुक्यात वाळू चोरी प्रकरण तापले; तहसीलदार बदलीनंतरच एटीएस मोजणी करा – मनसेची ठाम मागणी
Mantha, Jalna | Apr 28, 2026 जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पूर्णा नदी पात्रातून कोट्यवधी रुपयांच्या वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकृत वाळू घाटांची एटीएस मोजणी (ATS Measurement) करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंठा तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी त्यांची तात्काळ बदली करण्याची जोरदार मागणी केली आहे. याबाबत मनस