कळमेश्वर: निर्मल उज्वल सोसायटीतील ठेवीदारांचा संताप, आमचे पैसे कधी मिळणार? शासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी#jansmsya
कळमेश्वर येथील निर्मल उज्ज्वल सोसायटीमध्ये अडकलेल्या ठेवींच्या रकमेमुळे ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत गुंतविल्याचा दावा केला असून, वेळेवर पैसे न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ठेवीदारांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ वरील मजकुरात निर्मल उज्वल सोसायटी लोकांची आत्महत्या नंतर पैसे देतील का? अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली