रामटेक: शेतकरी भवन पंचायत समिती रामटेक येथे फार्मर कप स्पर्धक इच्छुकांची कार्यशाळा संपन्न
Ramtek, Nagpur | May 6, 2026 पंचायत समिती रामटेक येथील शेतकरी भवन येथे पाणी फाउंडेशन मार्फत राबविण्यात येणाऱ्या फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या निमंत्रक महिला, पुरुष शेतकरी यांची रामटेक तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. सहा मे ला सकाळी 11 वाजता पासून या कार्यशाळेत कृषी विभागातील व उमेद यांच्यातील मेंटार यांची ओळख करण्यात आली. कृषी मंडळ अधिकाऱ्यांद्वारे विस्तृत माहिती देण्यात आली.