नरखेड: खासदार मायाताई इवनाते यांची आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याशी सदिच्छा भेट
Narkhed, Nagpur | Jun 14, 2026 राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती मायाताई इवनाते यांनी काटोलचे आमदार श्री. चरणसिंगजी ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विकासकामे, जनहिताचे प्रश्न आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.