भंडारा जिल्ह्यातील सिंदपुरी येथील ७२ वर्षीय वयोवृद्ध महिला गोपिका सुभाष उताने (रा. सिंदपुरी) यांचा मृतदेह गावातील माता तलावात तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोपिका उताने या आजारी होत्या आणि त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्या दि. ०३ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्या होत्या, यासंबंधी सिहोरा पोलीस ठाण्यात गुम बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान शोध सुरू असताना दिनांक 4 नोव्हेंबर रोजी गावातील तलावाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर पोलीस व गावकऱ्य