वर्धा: आलोडीत २१ वर्षांची अखंड कार्तिकी काकड आरती परंपरा — भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याने समारोप
Wardha, Wardha | Nov 5, 2025 आलोडी गावातील वार्ड क्रमांक २ मध्ये मागील २१ वर्षांपासून चालत असलेली कार्तिकी काकड आरतीची परंपरा यंदाही भक्तीभावाने आणि नित्य नियमाने पार पडली. संकट मोचक हनुमान मंदिर, गणेश मंदिर ते शिवशंभू मंदिर असा एक महिन्याचा नित्यक्रम अखंडपणे सुरू होता.दररोज सकाळी भक्तांच्या “काकड आरती”च्या गजराने परिसर दुमदुमत होता. कार्तिकी एकादशीपासून या धार्मिक उपक्रमाची पालखी यात्रा सुरू करण्यात येते आणि आज गावातील विविध भागातून पालखी काढून विधिवत समाप्ती करण्यात आली.