रामटेक: राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांचा देवलापार आदिवासी क्षेत्रासह रामटेक येथे दौरा
Ramtek, Nagpur | Jul 10, 2026 राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांनी रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावांचा तसेच रामटेक शहराचा 9 व 10 जुलैला दौरा करून लोकप्रतिनिधी, नगरपरिषद, ग्रामपंचायत कार्यालयाला भेंट देऊन संवाद साधत समस्या, अडचणी समजून घेतल्या. त्या सोडविण्याचे तसेच आवश्यक विकास कामांना पुरेसा विकास निधी देण्याचे आश्वासन हे दिले.