हिंगणघाट: निशानपुरा वार्डातून चोरलेली अॅक्टिवा जप्त दोघांना अटक:शहर पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाची कारवाई
हिंगणघाट शहरातील निशानपुरा वॉर्डातून चोरीस गेलेली अॅक्टिवा गाडी शोधून काढत हिंगणघाट पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार पंकज राजेंद्र काळे वय ४५ वर्ष, रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली अॅक्टिवा क्रमांक AP 25 AM 6752 कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती.