हिंगणघाट: रिमडोह व डांगरी वार्डात अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रीमडोह गावाजळील हॉटेल रायगड जवळ आणि डांगरी वार्डात अशा दोन ठिकाणी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर विरोधात कारवाई करीत १लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी रीमडोह परीसरात दारूसह ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला. तर डांगरी वार्डात दारुसह ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला