हिंगणघाट: गाडगेबाबा वार्डात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, ९४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट: गाडगेबाबा वार्डात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करीत ९४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार गाडगेबाबा वार्ड परिसरात अवैध गावठी मोहा दारूची क्रमांक MH 32AY 2303 ह्या जुपिटर गाडीने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी गाडीचे डीक्कीतून १) ३ प्लास्टिक पनीतून ४५ लीटर गावठी मोहा दारू किंमत ४५०० रुपये गाडी क्रमांक MH 32AY 2303 किंमत ९० हजार असा एकूण ९४ हजार५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला