रामटेक: वाहिटोला येथील शेतात काम करताना करंट लागून युवकाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Aug 1, 2026 रामटेक जवळच्या वाहीटोला येथील एका शेतात कृषी कार्य करीत असताना एका 28 वर्षे युवकाचा विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना एक ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव दीपक अरुण सोना वय 28 वर्षे राहणार पाचगाव खैरी असे असून रामटेक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.