रामटेक: नेरला येथे ट्रक रिव्हर्स घेताना चाकात चिरडून मजुराचा जागीच मृत्यू
Ramtek, Nagpur | Jul 15, 2026 रामटेक - मौदा मार्गावरील नेरला गाव शिवारात मुरुमाने भरलेला ट्रक रिकामा करण्यासाठी मागे घेताना तो मुरूम रिकामा करण्यासाठी असलेल्या जागेवर झोपून असलेल्या एका मजुराच्या अंगावरून गेल्याने ट्रक खाली चिरडून मजुराचा जागीच मृत्यू झाला.ही घटना बुधवार दि. 15 जुलै च्या मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली. मजुराचे नाव नरेश सुखदेव बसिने वय 40 वर्ष रा. अजनी असे आहे.