रामटेक: थकीत वेतनासाठी देवलापार येथे हंगामी वनमजुरांचे आमरण उपोषण सुरू
Ramtek, Nagpur | Jun 23, 2026 देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रा अंतर्गत काम करणाऱ्या पीआरटी,आरआरटी हंगामी मजुरांचे आमरण उपोषण वनविभाग प्रादेशिक कार्यालय देवलापार समोर मंगळवार दिनांक 23 जूनला दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे. 21 जून पर्यंत पूर्ण वेतन देण्याचे आश्वासन वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ते न मिळाल्याने शेवटी हंगामी मजुरांनी आमरण उपोषण सुरुवात केली.