रामटेक: बोरडा - सराखा येथे घरावर पडले चिंचेचे झाड; घराचे मोठे नुकसान
Ramtek, Nagpur | Jul 3, 2026 रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या बोरडा सराखा येथील निवासी अक्षय राजू राऊत यांच्या घरावर गुरुवार दिनांक 2 जुलै च्या रात्री वादळी पावसात बाजूलाच असलेले जुने मोठे चिंचेचे झाड पडल्याने घराचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. घर पडल्याची माहिती मिळतात ग्रामपंचायतचे उपसरपंच पंकज चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सरपंचास याबाबत कळविले. मंडळाच्या पटवारी यांनी 3 जुलै ला घटनास्थळी येऊन पंचनामा केला.