जालना: सामनगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 45 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Aug 16, 2026 जालना जिल्ह्यातील सामनगाव रस्त्याने विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणार्या दोन हायवा वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत वाळूसह दोन हायवा असा एकूण 45 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दि.16 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.