कळमेश्वर: ब्राह्मणी येथील झेंडा चौक येथून अज्ञात चोरट्यांनी केली बैलजोडीची चोरी
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत ब्राह्मणी येथील झेंडा चौक येथून अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या तीन वाजताच्या सुमारास शेतकऱ्याची बैलजोडी चोरून नेल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या जोडीची किंमत एक लाख रुपये असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आठवड्यातील सलग दुसरी घटना असल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.