समुद्रपूर: शिवणी पारधी बेड्यावरील गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी कारवाई करुन ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला नष्ट
पोलिसांनी शिवणी बारधी बेड्यावर अवैध दारू गाळपाणा विरोधात धडक कारवाई करीत ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करीत दोन महिलांवर गुन्हा दाखल केला.प्राप्त माहितीनुसार समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना शिवणी बारधी बेड्यावर अवैध दारूचे मोठ्या प्रमाणात गाळपण होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह या ठिकाणी धाड टाकून झाडा झुडपात गाडून असलेल्या गावठी मोहा सडवा व मोहा दारू असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला