समुद्रपूर: फरीदपुर येथे मगन संग्रहालयाच्या वतीने करण्यात आली जैविक पोषण वाटिका परसबाग विषमुक्त भाजीपाला जनजागृती
समुद्रपुर तालुक्यातील फरीदपुर येथे गुरुवारी १ वाजता गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने जैविक पोषण वाटिका परसबाग विषमुक्त भाजीपाला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जैविक पोषण वाटिका परसबाग विषमुक्त भाजीपाला आहारातून कुटुंबाला मिळावा या दृष्टिकोनातून मगन संग्रहालय समितीच्या माध्यमातून टमाटर ,वांगी, मिरची भाजीपाला रोपांचे 130 महिला लाभार्थ्यांना वितरण करण्यात आलेले आहे याप्रसंगी उपस्थित सर्व फरीदपुर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.