रामटेक: भंडारबोडी गावातील माजी सरपंच, उपसरपंच सह नागरिकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
Ramtek, Nagpur | Jun 6, 2026 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांनी प्रेरित होऊन शनिवार दिनांक 6 जूनला दुपारी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे रामटेक तालुक्यातील भंडारबोडी येथील माजी सरपंच, उपसरपंच सह काही युवक, नागरिकांनी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भगवान दुपट्टा परिधान करून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.