रोहा: कोलाड परिसरात पूर्व मशागतीची कामे पूर्ण
Roha, Raigad | Jun 13, 2026 पाऊस २५ मे नंतर पडेल या अंदाजामुळे कोलाड परिसरातील बळीराजाने शेतीची पुर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. परंतु पाऊस लांबणीवर गेल्यामुळे बळीराजा पाऊसाची वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. दरवर्षी २५ मे नंतर रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यानंतर भातपेरणी केली जाते परंतु पाऊस लांबणीवर गेल्यानंतर मृग नक्षत्र सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही यामुळे भात पेरणी करायची कि नाही या सभ्रमात शेतकरी वर्ग पडला आहे.