'सेवा संकल्प अभियान '
नरसी येथे 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत ग्रामस्थांचे उत्साहात श्रमदान
786 views | Nanded, Maharashtra | Oct 2, 2026 नायगाव (नांदेड): नायगाव तालुक्यातील नरसी ग्रामपंचायतीच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. "एक तारीख, एक तास, एक साथ" या आवाहनानुसार ग्रामपंचायत कार्यालय ते गावातील प्रमुख मार्गांवर स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. या मोहिमेत गावातील पदाधिकारी, महिला आणि नागरिकांनी हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष रस्ते स्वच्छ करत उत्स्फूर्त श्रमदान केले.