गॅसच्या काळ्या बाजारामागील 'ते' मुख्य सूत्रधार कोण ? छावा मराठा संघटनेचा सवाल.
#chhavasanghatana #pimprichinchwad #GasScam #crime #news
पिंपळे गुरव : घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने पर्दाफाश करण्यात आला. पिंपळे गुरव येथील 'भैरवनाथ भारत गॅस एजन्सी' च्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या १४ किलोच्या घरगुती सिलेंडरमधून तब्बल ४-४ किलो गॅस काढून तो चढ्या दराने बाजारात विकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पडताळणी केली. गॅस चोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गॅस सप्लायर आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्�
Pune City, Pune | Aug 26, 2026