रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी सिल्लारी येथे घेतली वनविभागाची आढावा बैठक
Ramtek, Nagpur | Apr 13, 2026 पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत वाघांच्या हल्ल्यात सतत वाढ होत असून मानव व वन्य जीव संघर्ष वाढत आहे. यावर केलेल्या उपाययोजना बाबत आढावा घेण्यासाठी सोमवार दिनांक 13 एप्रिलला दुपारी दीड वाजताच्या सुमारास सिल्लारी येथील वनविभागाचे सभागृह येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली.