नरखेड: सावरगावात वीज खांबाच्या अर्थिंगमुळे दोन गाईंसह कालवडीचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Narkhed, Nagpur | Jun 28, 2026 सावरगाव येथे आज रविवार, दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज खांबाच्या अर्थिंगमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने झालेल्या अपघातात दोन दुधाळ गाई आणि एका कालवडीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.