अलिबाग तालुक्यातील खानाव-वढाव परिसरात आज सायंकाळी अचानक पुलाचा एक मोठा भाग कोसळला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्राथमिक माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावरून काही वाहने जात असताना अचानक काँक्रीटचा भाग खचला आणि पुलाचा मधला भाग जमिनीत कोसळला. अपघात घडताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, वाहतुकीसाठी दोन्ही बाजू बंद केल्या.