बुटीबोरी-नागपूर हायवेवरील डोंगरगाव जवळ आज रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव परिसरात रस्त्याच्या कडेला टेडी बियर व इतर दुकाने लागली असतात.या दुकानांना अचानक आग लागली आणि वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरली. आगीची भीषणता इतकी होती की लांबूनही धुराचे लोट दिसत होते.