छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरात दि.18 आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज पहिला कार्यक्रम पार पडला. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांसाठी दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणी आहे.