जालना: धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Jalna, Jalna | Sep 7, 2026 धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी, जालना यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाजाचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानुसार राज्यभरातील जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांसमोर आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात आले.