इंदापूर: इंदापूरात शुक्रवारी अजितदादा भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीला
Indapur, Pune | Apr 18, 2024 इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी(दि.19) वाघ पॅलेस येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी गुरूवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.