अमरावती: दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना*
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर,
मेळघाटातील खुटीया, एकताई, सिमोरी, हातरू येथील रस्ते, वीज, पुल आदींच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. मेळघाटातील नागरिकांनी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. त्यानुषंगाने मागण्यासंदर्भात गावातील नागरिकांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली.