नागपूर ग्रामीण: वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप; स्वतंत्र ओबीसी कॉलमशिवाय जातिनिहाय जनगणना अपुरी!
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करत जातिनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असण्याची जोरदार मागणी केली आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी लोकसंख्या समोर येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप केला आहे.तसेच, जोपर्यंत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा देत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.