🚔 कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात २६ नवीन वाहनांचा समावेश 🚔
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २६ नवीन वाहनांचे लोकार्पण आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सन २०२५-२६ या वर्षात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे ₹२.८० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, वज्र आणि मोटारसायकलींसह विविध वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.
या नव्या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता, प्रतिसाद क्षमता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीची सेवा अधिक सक्षम होणार आहे.
सुरक्षित कोल्हापूरसाठी सक्षम पोलीस दल.
#KolhapurPolice #PublicSafety #KolhapurDistrictPolice #MaharashtraPolice #SafeKolhapur
8 views | Kolhapur, Maharashtra | Jun 15, 2026